ताबा सुटल्याने दुचाकी मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून पुन्हा रस्त्यावर कोसळली; दोन रुग्णवाहिकांतून जखमींना उपचारासाठी हलविले
दोडामार्ग ,दि. १६ ऑगस्ट
दोडामार्ग ते तिलारी मार्गावर साटेली भेडशी येथे रविवारी रात्री सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. श्रीकांत केसरकर यांच्या घरासमोर दुचाकी रस्ता सोडून बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढली आणि त्यानंतर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर आदळली. या स्वयं अपघातात साटेली आवाडा येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून, दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
