दोडामार्ग: उसप ग्रामसभेत काळा दगड उत्खनन व कुञिम वाळू प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव

शेअर करा

गायरान जमीन उद्योगासाठी देण्याच्या हालचालींना ग्रामस्थांचा तीव्र विरोध; विशेष ग्रामसभेत शेकडो नागरिकांची उपस्थिती, प्रकल्प हद्दपार करण्याची मागणी

दोडामार्ग, दि. २१ जुलै
उसप गावातील ग्रामस्थ याना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता या ठिकाणी असलेली गायरान शेकडो एकर जमीन गोवा येथील उद्योजक यांच्या घशात घालण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू होत्या या संदर्भात
१५ जुलै रोजी पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी आले असता संतप्त ग्रामस्थ यांनी परतावून लावले होते. या नंतर ग्रामसभेत तीव्र विरोध करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उसप ग्रामपंचायत मध्ये आयोजित विषेश ग्रामसभेत जमलेल्या शेकडो ग्रामस्थ यांनी काळा दगड उत्खनन, कुञिम वाळू प्रकल्प गावातून हद्दपार झाला पाहिजे यासाठी कडाडून विरोध ठराव मंजूर करण्यात आला.
मंगळवारी उसप ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसभा पार पडली यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थ माजी सरपंच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सुरू झालेल्या ग्रामसभेत माजी सरपंच प्रकाश गवस, यांनी उसप गावातील गायरान जमीन आमच्या हक्काची आहे. या ठिकाणी काळा दगड उत्खनन किंवा कुञिम वाळू प्रकल्प उभे करण्याचा प्रशासनाला अधिकारी नाही तेव्हा अशा प्रकल्पाला आपण विरोध आहे असा विरोधी प्रस्ताव मांडला. याला उसप गावातील सुरेश गवस यांनी अनुमोदन दिले. यावेळी लक्ष्मण नाईक, बाबू गवस, धनंजय गवस, तसेच उपस्थित महिला यांनी विविध मुद्दे उपस्थित करत हा प्रकल्प कशा प्रकारे घातक ठरू शकतो हे मुद्दे ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थ यांच्या समोर मांडले.
जमलेल्या दिडशे पेक्षा जास्त ग्रामस्थ यांनी हात वर करून या प्रकल्पाला कडाडून विरोध केला व तसा ठराव बहुमताने पास केला.

शेअर करा