माटणे काटा येथे मोटारसायकल व स्कुटरची जोरदार धडक; दीपक कुंभार (रा. मयेम, गोवा) यांचा जागीच मृत्यू, जखमींना गोव्यात पुढील उपचारासाठी हलविले.
दोडामार्ग, दि. २२ जुलै
दोडामार्ग ते आयी मार्गावर माटणे काटा येथे बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल व स्कुटर दरम्यान झालेल्या भिषण अपघातात गोवा मयेम येथील एका युवकाचा जागीच मृत्यु झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय मध्ये उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. अपघात माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांनी जखमींना मदत करत रुग्णवाहिका मध्ये नेले. सुसाट मोटार सायकल एका युवकाच्या मृत्यला कारणीभूत ठरली पोलीस आता तरी अशा वाहन धारकांवर कारवाई करणार काय?
दोडामार्ग ते आयी मार्गावर हा भिषण अपघात झाला. झालेल्या अपघातात मयेम गोवा येथील दिपक कुंभार वय वर्षे २७ हा तरूणाचे जागीच निधन झाले. तर
गणू उसपकर, मये गोवा वय वर्षे २६ , रामा सुरेश गवस, जयराम शिरोडकर हे दिघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका कर्मचारी यांनी तातडीने उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले.
मोटार सायकल एवढी सुसाट होती स्कुटरला जोरदार धडक देत रस्ता कडेला असलेला दगड उडवून वीस फूट फरफटत जाऊन रस्ता कडेला पडली. स्कुटरचा चेंदामेदा झाला . मयत याचे हात पाय मोडले मेंदू फुटला यावरून हा अपघात किती भयानक होता हे लक्षात येते.
