दोडामार्ग–आयी मार्गावरील खड्ड्यांवर नागरिकांचा अनोखा निषेध

शेअर करा

रस्त्यातील खड्ड्यात डबा ठेवून वृक्षारोपण; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त

दोडामार्ग,दि.०६ ऑगस्ट

सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या दूर्लक्ष पणामुळे वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. रस्ते निर्माण करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करून देखील दोडामार्ग तालुक्यातील रस्ते सुरक्षित नाही दोन तीन महिन्यात खड्डे पडू लागले यावरून किती निकृष्ट दर्जाची कामे केली जातात हे उघड झाले आहे. दोडामार्ग ते आयी रस्त्यावर बाजारपेठ मध्ये चक्क रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचले आहे. याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे काही अनोळखी व्यक्ती यांनी खड्डयात डबा ठेवून वृक्षारोपण करत बांधकाम विभाग यांच्या ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणला.

दोडामार्ग ते आयी रस्त्यावर बाजारपेठ मध्ये रस्त्यावर मध्यभागी खड्डे पडले आहेत यात पावसाचे पाणी साचले आहे यातून वाहन गेले की पाणी पादचारी तसेच बाजूला असलेल्या घरात दुकानात उसळते यामुळे कपडे खराब होतात घरात दुकानात चिखल होतो. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडून कल्पना देऊन देखील खड्डे बुजवले गेले नाही.
दोडामार्ग बाजारपेठ मध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे याकडे दुर्लक्ष झाले यामुळे नागरिक वाहन धारकांना होणारा मनस्ताप या पार्श्वभूमीवर गुरुवारी काही अज्ञात व्यक्तींनी पडलेल्या खड्डयात डबा घेऊन तो खड्डयात ठेवून वृक्षारोपण करत बांधकाम विभाग यांच्या ढिसाळ कारभार याचा पोल खल उघड केला.

शेअर करा