पाच मल्लांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
फोंडाघाट,दि.०१ ऑक्टोंबर( संजय सावंत)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
दरम्यान या स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगट मुली विभागामध्ये ऋतुजा चव्हाण. ( ४९ किलो वजनगटात ) द्वितीय क्रमांक.१७ वर्षे वयोगट मुले विभागामध्ये दुर्वांक नातू (४५ किलो वजनगटात) प्रथम क्रमांक, श्रीहरी गिरीबुवा ( ६५ किलो वजनगटात) प्रथम क्रमांक तसेच १९ वर्षे वयोगट मुले या गटात तेजस पारकर ( ५७ किलो वजनगटात) तृतीय क्रमांक, केदार पुजारी ( ६१ किलो वजनगटात ) प्रथम क्रमांक, आकाश गोंधळी ( ६५ किलो वजनगटात) प्रथम क्रमांक, प्रथमेश चिखले (७२ किलो वजनगटातील ग्रीको-रोमन प्रकारात ) प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
यावेळी प्रथम क्रमांक मिळविलेल्या १)दुर्वांक नातू २)श्रीहरी गिरीबुवा ३) केदार पुजारी ४) आकाश गोंधळी ५) प्रथमेश चिखले या पाचही मल्लांची कोल्हापूर विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे फोंडाघाट प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. पोफळे सर यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. म. ज. सावंत, सेक्रेटरी मा. श्री. चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. वि. रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार, मा. संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्र. कृ.पारकर ,पर्यवेक्षक श्री. वि. पां.राठोड, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.