फोंडाघाट : शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटची दमदार कामगिरी

शेअर करा

फोंडाघाट,दि.१३ ऑगस्ट (संजय सावंत)
  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत  न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
  इयत्ता सातवीतील कु. पूर्वा मारुती लाड हिने कणकवली तालुक्यात चतुर्थ क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. तसेच रुद्राक्ष विजयकुमार राठोड आणि कु. लिशा पंढरीनाथ गुरव यांनीही शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत प्रशालेच्या यशात भर घातली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. म. ज. सावंत, सेक्रेटरी मा. श्री. चं. शा. लिंग्रस, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद पारकर सर आणि पर्यवेक्षक श्री. राठोड सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
  यावेळी प्रशालेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेअर करा