कणकवली : वारंगावच्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सरपंच नारायण शेट्ये यांचा स्तुत्य उपक्रम

शेअर करा

शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांना मोफत नारळ वाटप

कणकवली,दि.१५ जुलै

शालेय पोषण आहार अधिक पौष्टिक आणि सकस व्हावा या उद्देशाने वारंगाव ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण शेट्ये यांनी गावातील सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आवर्जून मोफत नारळ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासोबत पोषक आहार मिळणार असून त्यांच्या आरोग्यवृद्धीसही हातभार लागणार आहे. नारळातील नैसर्गिक पोषक घटक विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असल्याने या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.

या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाबद्दल सर्व प्राथमिक शाळा, वारंगाव यांच्या वतीने सरपंच नारायण शेट्ये यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत राबविण्यात आलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

शेअर करा