दोडामार्ग : हर्षद हुंदळेकर खूनप्रकरणी आरोपीच्या मैत्रिणीला अटक

शेअर करा

जंगमहट्टी ग्रामस्थांची चंदगड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी

दोडामार्ग, दि. ३ सप्टेंबर

चंदगड जंगमहट्टी गावातील युवक हर्षद प्रकाश हुंदळेकर याला इन्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून प्रेम संबंध ठेवून हर्षद हुंदळेकर याला बोलावून घेऊन त्याचे अपहरण करून मृतदेह तिलारीनगर पासून जवळ असलेल्या स्वप्नवेल नजीकच्या दरीत नदी पाञात टाकण्यात आला होता. चंदगड पोलिसांनी दोन दिवस शोधमोहीम राबविण्यात आली या नंतर गुरूवारी दुपारी मृतदेह रेस्क्यू टीम चंदगड पोलीस यांच्या हाती लागला सायंकाळी सहा वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. मृतदेह सापडला हे समजाताच जंगमहट्टी गावातील शेकडो ग्रामस्थ चंदगड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते राञी उशिरा पर्यंत लोक पोलीस ठाण्यात होते. युवक हर्षद हुंदळेकर याला फोन करून बोलावून घेतलेल्या संशयित आरोपी यांच्या मैञीणीवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे यामुळे या खून प्रकरणातील आरोपी संख्या चार झाली आहे.

शेअर करा