Kankavli news:कणकवली नगरपंचायतीच्या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांचे रक्तदान….

शेअर करा

‘सेवा संकल्प अभियान’ व नगरपंचायतीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.....

कणकवली,दि.१७ ऑक्टोंबर
कणकवली नगरपंचायत, कणकवली येथे ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच नगरपंचायतीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक राधाकृष्ण नार्वेकर, लुकेश कांबळे, नगरसेविका जाई मुरकर, दीपिका जाधव आणि प्रशासकीय अधिकारी अमोल अघम उपस्थित होते.
यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी प्रशांत राणे, अक्षता रोळे, सतीश कांबळे, अमोल भोगले, ध्वजा उचले, निकीता पाटकर, मनोज तोरस्कर, सूरज शिवगण, संतोष पाताडे, संदीप उबळकर, राजेश राणे, सुमित कुबल, माधुरी डगरे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग कणकवली तालुका सचिव सुशील परब, नवजीवन ब्लड बँकेच्या सुप्रिया पवार, ऋषिकेश कोरडे, इतर नगरपंचायत कर्मचारी, ब्लड बँकेचे कर्मचारी आणि रक्तदाते उपस्थित होते.

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश…..
या शिबिरादरम्यान नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, नगरसेवक संजय कामतेकर, संकेत नाईक आणि राकेश राणे व नगरपंचायत कर्मचारी यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या या सहभागामुळे इतर रक्तदात्यांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहन मिळाले.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नगरपंचायतीच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजहिताचा संदेश देण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमातून सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.

शेअर करा