कणकवली,दि.०६ जुन
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) पदावर अनिरुद्ध देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री. देसाई यांच्या नियुक्तीमुळे बँकेच्या कामकाजाला अधिक गती मिळून ग्राहकाभिमुख सेवा, आधुनिक बँकिंग सुविधा आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला.