कणकवली : शासकीय रुग्णालयातील सशुल्कसीटी स्कॅन सेवा निर्णय पालकमंत्री नितेश राणेंनी तातडीने थांबवला

शेअर करा

कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेडला सीटी स्कॅन सेवा विनामूल्य ठेवण्यासाठी डॉ.श्रीपाद पाटील यांचे पत्र ; पालकमंत्री नितेश राणे यांचे संदीप मेस्त्री, अण्णा कोदे यांनी वेधले होते लक्ष

कणकवली,दि.०२ सप्टेंबर

जिल्ह्यातील सावंतवाडी व कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली सीटी स्कॅन सेवा रुग्णांसाठी विनामूल्य सेवा आज पासून सशुल्क करण्यात आली होती.याबाबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्काळ दाखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना विनामूल्य सेवा सुरु ठेवण्याचे निर्देश दिले.त्यामुळे कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेड यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील पत्र देत सेवा विनामूल्य सुरु ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सीटी स्कॅन सेवेसाठी संबंधित संस्थेसोबत करार करण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. मात्र,आजपासून सिटीस्कॅन सशुल्क सेवा सुरु करण्यात आली.त्यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करून विनामूल्य सेवा अखंडित ठेवणे आवश्यक आहे.सिंधुदुर्ग हा दुर्गम व अतिदुर्गम जिल्हा असून सावंतवाडी व कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालये महामार्गालगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच हृदयविकार, मेंदूचा झटका आणि इतर आकस्मिक व अत्यावश्यक रुग्णांवरही येथे उपचार केले जातात.

अशा परिस्थितीत सीटी स्कॅन सेवा सशुल्क केल्यास गंभीर रुग्णांच्या उपचारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठी ही सेवा कोणत्याही परिस्थितीत विनामूल्य आवश्यक आहे. डॉ.पाटील यांच्या पत्रामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, सीटी स्कॅनसारखी अत्यावश्यक तपासणी शासकीय रुग्णालयातून विनामूल्य उपलब्ध राहणार आहे.

शेअर करा