तळेरे,दि.०२ सप्टेंबर
तळेरे औदुंबर नगर येथील रहिवासी असलेले आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष शिवराम तळेकर ( वय – ६८ ) यांचे नुकतेच राहत्या घरी आकस्मिक दुःखद निधन झाले.
त्यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलात जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात आपली सेवा बजावली होती. शेवटी वैभववाडी पोलिस स्थानकातून ते सेवा निवृत्त झाले होते.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.