कणकवली : वारगाव येथे पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली

शेअर करा

कणकवली,दि.०७ जुन


वारगाव ग्रामपंचायत, शाळा व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या सायकल रॅलीद्वारे गावातील ठिकठिकाणी जावून नागरिकांमध्ये पर्यावरण व स्वच्छतेची जनजागृती केली. वारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच नाना शेटये यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अश्फाक हाजू , ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद केसरकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या मयुरी गुंड, विलास तळेकर , राजाराम बोभाटे, विलास मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शाळा वारगाव क्र. १ च्या मुख्याध्यापिका अर्चना तळगावकर तसेच ऋतुजा जंगले, विश्वनाथ चव्हाण, शिवानी देसाई, अलका मोरे, समिधा शेटये, अंगणवाडी सेविका स्वाती मेस्त्री, मयुरी गुरव आणि प्राथमिक शाळा वारगावचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सायकल रॅलीद्वारे पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त गाव, स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेअर करा