कणकवली शहराचा सी.टी सर्व्हे नव्याने करण्यात यावा …

शेअर करा

महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बंडू हर्णे यांची मागणी ..

कणकवली ,दि.०३ ऑगस्ट

कणकवली शहराचा सी.टी सर्व्हे १९८५ साली भागशः करण्यात आला आहे. उर्वरीत शहराचा सी.टी सर्व्हे अद्यापही झालेला नाही. सन १९८५ मध्ये भागशः झालेल्या सी.टी सर्वे मध्ये अनेक हिस्से एकत्र करण्यात आले आहेत. त्यानुसार मिळकत पत्रिका झाल्या आहेत. व्यक्तीशः जमिन मालकाला आपल्या जमिनीची मोजणी न.भु. मध्ये सामाविष्ट असलेल्या इतर जमिन मालकांच्या संमत्तीखेरीज आपली स्वतःची जामिन मोजणी करता येत नाही. याबाबत कणकवली माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावर महसुल मंत्र्यांनी आपण याबाबत लवकरच स्वतंत्र सर्व्हे करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या जमिनीचा हद्द ठराव नागरिकांना मोजणी करुन घेता येत नाही. त्याचबरोबर सन १९८५ मध्ये सी.टी सर्व्हे मोजणी होताना व मिळकत पत्रिका बनताना सामाईक जमिनीमध्ये उपस्थित असलेल्या एकाच व्यक्तीचे नाव मिळकत पत्रिकेमध्ये दाखल झाले आहे. फक्त मिळकत पत्रिका धारकांच्या वारसांना वारस म्हणून नावे लागली जात आहेत. इतर सहहिस्सेदारांची नावे सदर मिळकतीत नोंद होत नाहीत. सदर या सर्व बाबतीमुळे कणकवली शहरातील प्रत्येक मिळकत धारकाचे सहहिस्सेदार हे आपल्या जमिनीच्या सामाईक मालकीच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. तरी सदर कणकवली शहराचा सी.टी सर्व्हे हा दोषमुक्त होऊन संपुर्ण शहराचा सी.टी सर्व्हे नव्याने करण्यात यावा, अशी मागणी बंडू हर्णे यांनी महसुल मंत्र्यांकडे केली.

शेअर करा