मच्छिमारांना शेतकऱ्याचा दर्जा मिळवून देणे हा ऐतिहासिक निर्णय; मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही
कणकवली,दि.०३ ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य मत्स्य व बंदरे मंत्रालयात आजपर्यंत कोणीही काम केलेले नाही. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त काम मंत्री नितेश राणे काम करत आहेत. राज्यातील मच्छीमार बांधवांना शेतकऱ्याचा दर्जा दिला , हे काम आज पर्यंतच्या मत्स्य मंत्रालयाच्या इतिहासात कोणीच करु शकलेला नाही, असे ऐतिहासिक निर्णय मंत्री नितेश राणे यांनी घेतले आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्य खात्यात अनेक क्रांतीकारी निर्णय झाले आहेत, असे कौतुगोद्गार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे तोंड भरून कौतुक केले. या निर्णयामुळे मच्छिमार बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न महाराष्ट्रात शिल्लक राहणार नाही, असा मला विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.