कणकवली : खारेपाटण तालुक्याची निमिर्ती झालीच पाहिजे

शेअर करा

तालुका निर्मिती कृती समितीच्या मेळाव्यात एल्गार : ४५ वर्षांपासूनच्या मागणीला न्याय द्या

कणकवली ,दि.२८ सप्टेंबर

खारेपाटण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन तालुका निर्माण करून येथील जनतेची गेली ४५ वषार्पासूनची जुनी असलेली मागणी पूर्ण करावी. गेल्या ४५ वर्षांपासून खारेपाटण तालुका निर्मितीसाठी लढा सुरू आहे. अधिकृत या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. खारेपाटण तालुका झालाच पाहिजे, अशी भूमिका जवळपास ४० गावांतील प्रमुख लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली. जोपर्यंत खारेपाटण तालुका निर्मितीचे आदेश निघत तोपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
खारेपाटण हायस्कूल येथे खारेपाटण तालुका निर्मितीसाठी कृती समितीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कणकवली,देवगड, वैभववाडी व राजापूर या तालुक्यातील सुमारे ४० गावातील एक हजार नागरिक उपस्थित होते. खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या हस्ते सुमारे ४० गावातील सरपंच,उपसरपंच तंटामुक्त समिती अध्यक्ष,पोलिस पाटील व गावप्रमुख यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला जि.प. सदस्य प्राची ईस्वलकर,माजी जि.प.सदस्य बाळा जठार, खारेपाटण पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,तळेरे पं.स.सदस्य राजेश जाधव,पोंभुर्ले पं.स. सदस्य सादिक डोंगरकर,माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर,चिंचवली सरपंच अशोक पाटील,वायंगणी सरपंच प्रताप फाटक,नडगिवे सरपंच भूषण कांबळे,कुरंगवणे – बेर्ले सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,वारगाव सरपंच नाना शेट्ये,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, तिथवली माजी सरपंच संतोष हरयाण, शिडवणे सरपंचरवींद्र शेट्ये,कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर,कुणकवण उपसरपंच मंगेश गुरव, दिलीप तांबे, श्री. चव्हाण, विनायक राणे, साठवण कदम, भूषण शेलार, श्री सुर्वे, खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, श्री देव कालभैरव मंदिर खारेपाटण ट्रस्ट अध्यक्ष मधुकर गुरव, खारेपाटण व्यापारी असो.अध्यक्ष चेतन हुले,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत म्हणाले, खारेपाटण तालुका निर्मितीसाठी लढा हा कांताप्पा शेटये यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला. गेली ४५ वर्षे शासनाच्याकडे पाठपुरवठा असून लगतच्या ४० गावांचा या मागणीला पाठिंबा आहे. पालकमंत्री नितेश राणे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. प्राची ईसवलकर म्हणाल्या, खारेपाटण ही माझी जन्मभूमी असून त्याचे तालुक्यात रूपांतर झाल्यास मला त्याचा अभिमान आहे.आणि खारेपाटण तालुकाच होईल असा माझा दृढ विश्वास आहे. बाळा जठार म्हणाले, खारेपाटण ने माझी राजकीय कारकीर्द घडली असून खारेपाटण तालुका होण्यासाठी आमचा १०० टक्के पाठिंबा असून समितीने सर्ववसावेशक तयारीने काम करावे.

सादिक डोंगरकर म्हणाले,
देवगड पंचायत समिती अंतर्गत पोंभुर्ले पंचायत समिती अंतर्गत सर्व गावांचा खारेपाटण तालुक्याला पाठिंबा आहे. राजेश जाधव म्हणाले, खारेपाटण तालुका झालाच पाहिजे याकरिता आमचा पाठिंबा असून समितीने सर्व गावांना घेऊन काम करावे. गुरुप्रसाद शिंदे म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे खारेपाटण तालुका करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतील. महेंद्र गुरव म्हणाले, खारेपाटण तालुका ही आमची जुनी मागणी असून परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर आहे. शासनाने आता वेळ न दवडता.लोकांची होणारी गैरसोय दूर करून खारेपाटण तालुका जाहीर करावा. सूत्रसंचालन ऋषिकेश जाधव यांनी केले. प्रास्ताविक कृती समितीचे सचिव संतोष पाटणकर यांनी केले. आभार समितीचे सदस्य प्रशांत लाड यांनी मानले.

शेअर करा