कणकवली : कसबा येथे आमदार प्रमोद जठार यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

शेअर करा

कणकवली ,दि.०२ जुन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास आमदार प्रमोद जठार यांनी भेट देऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी उपस्थित शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी “छत्रपती संभाजी महाराज की जय” तसेच “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. घोषणांमुळे वातावरण शिवमय झाले होते.

भाजप आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, राजू महाडिक, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, डॉ. ताटरे, विनोद म्हस्के, प्रतीक देसाई, सतीश पटेल, कोमल रहाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा