कणकवलीत निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह शनिवारी

शेअर करा

कणकवली,दि.२१ ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत साधकांसाठी दर्जेदार व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच शास्त्रोक्त संगीत प्रसारासाठी राबविण्यात येणाऱ्या वार्षिक उपक्रमांतर्गत संगीतज्ञ कै. निवृत्ती दाभोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त ‘निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह’ आयोजित करण्यात आला आहे.

हा संगीत समारोह शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता कणकवली कॉलेज येथील एचपीसीएल हॉलमध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक गंधर्व फाउंडेशन, कणकवली असून कै. निवृत्ती दाभोळे शिष्यवृंद आणि मित्र परिवार यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात आदर्श संगीत विद्यालय, कणकवली येथील शिरशद पदवी संपादन केलेल्या शिष्यांचे शास्त्रोक्त गायन तसेच नाट्यपद, अभंग गायनाचे मैफल सादर होणार आहे. गायनाची मैफल सौ. मृणाल गावकर, सौ. नेहा देशपांडे, कु. मिन्नल केळुसकर आणि कु. विदिता जोशी सादर करणार आहेत.

साथसंगतीमध्ये श्री. संदिप पेंडुरकर (संवादिनी) आणि श्री. वैभव सुतार (तबला) सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे सचिव मान. श्री. विजयकुमार वंजू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत समारोहाचा आनंद घ्यावा, असे आवाहन गंधर्व फाउंडेशन, कणकवली आणि आयोजकांनी केले आहे.

शेअर करा