Kankavli : कलमठ बाजारपेठेत ओंकार मित्रमंडळाचा ३३ वा नवरात्रोत्सव

शेअर करा

रविवार, ११ ऑक्टोबर रोजी उद्घाटन; गरबा नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली,दि.०९ऑक्टोबर

सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या कलमठ बाजारपेठ येथील ओंकार मित्रमंडळाच्या वतीने यंदा ३३ व्या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता नवरात्रोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.

ओंकार मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाने परिसरातील नागरिकांशी आपले घट्ट नाते जपले आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्तही गरबा नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार असून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणून सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

या नवरात्रोत्सवाच्या उद्घाटन समारंभासह पुढील विविध कार्यक्रमांना कलमठ बाजारपेठ व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन ओंकार मित्रमंडळाचे अध्यक्ष निलेश महेंद्रकर यांनी केले आहे.

शेअर करा