सिंधुदुर्गातील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये केली होती मेहनत
कणकवली, दि.३० मे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये मेहनत घेणारे गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची प्रशासकीय बदली रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे.
गेल्या चार वर्षांच्या काळात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तीनशेहून अधिक घरफोडी, चोरी, चैन स्नॅचिंग, जबरी चोरी यांसारख्या गंभीर गुन्हे उघडकीस आणले. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये जाऊन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.