कणकवली : भजनी बुवा व मृदुंग वादकांच्या समस्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय – आ.प्रमोद जठार

शेअर करा

लोकपरंपरा जपणाऱ्यांच्या कलावंताच्या महायुतीचे सरकार पाठीशी ;भजनी मंडळांचे बुवा आणि मृदुंग वादक बैठक

कणकवली,दि.२० जुलै

भजन ही कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, भजनी बुवा आणि मृदुंग वादक ही समृद्ध लोकपरंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात अध्यात्म, संस्कार आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्याचे मोठे योगदान आपण देत आहात. त्यामुळे आपण सर्व भजनी बुवांच्या पाठीशी कायम ठामपणे उभा आहे, असे आश्वासन भाजपा आ .प्रमोद जठार दिले.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांचे बुवा आणि मृदुंग वादक यांनी भेट घेऊन आपल्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. या भेटीप्रसंगी बुवा संतोष कानडे, बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोष मिराशी, बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा गोपी लाड, मारुती मेस्त्री, हेमंत तवटे, सुदर्शन फोपे, पंढरी जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अनेक भजनी बुवा व मृदुंग वादक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या अडचणी आ .प्रमोद जठार यांनी जाणून घेतल्या. तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भजनी बुवांनी आपल्या कला क्षेत्राशी संबंधित विविध अडचणी, सुविधा आणि शासनाकडून अपेक्षित सहकार्याबाबत सूचना मांडल्या. त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आ.प्रमोद जठार यांनी दिले.

शेअर करा