लाठीहल्लाच्या निषेधार्थ कणकवलीत २३ जुलै रोजी आक्रोश आंदोलन

शेअर करा

कणकवली,दि.२२ जुलै

पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज मुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झालेले आहेत. केंद्र सरकारने केलेल्या या दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा व जिल्ह्यातील संविधान वादी,लोकशाहीवादी,संघटनांच्या वतीने गुरुवार २३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत कणकवली येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणार्कृती पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा,संविधानवादी, आंबेडकरवादी, बहुजनवादी, विविध समविचारी राजकीय पक्ष, संघटना, धार्मिक संघटना, राजगृहाचे निष्ठावंत, बाळासाहेब आंबेडकर प्रेमी, जिल्ह्यातील जनतेने ल़ोकशाही मार्गाने होणाऱ्या या आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे वंचितचे जिल्हाध्यक्ष तथा समाजभूषण तानाजी कांबळे यांनी केले आहे. या आंदोलनात वंचितचे जिल्हा पक्षीय निवडणूक निरीक्षक विश्वनाथ कदम , समाजभूषण प्रभाकर जाधव, इंजि. अनिल जाधव, अ‍ॅड. सुदीप उर्फ भाई कांबळे, श्यामसुंदर वराडकर, नगरसेवक लुकेश कांबळे, व्ही.डी.जाधव, राज नागवेकर, सुभाष जाधव, भीमराव जाधव, संदीप तळगावकर, गौतमी तळगांवकर, नरेंद्र तळगांवकर, दीपाली कांबळे, मंगेश जाधव, भिकाजी जाधव, उत्तम मुंबरकर, मिलिंद कदम, अरुण जाधव, सुनिल जाधव, सुनिल जाधव वेतुरेकर, प्रभाकर कदम, वसंत कांबळे,भगवान राठीवडेकर,सागर चव्हाण, विलास कासकर, सखाराम कदम, महादेव मोटे, उपाध्यक्ष,सईद नाईक,अनिल चव्हाण, मनोहरराव पेडणेकर, संघटक, मधुकर कदम आदी सहभागी होणार आहेत.

शेअर करा