बोगस मतदारांबाबत आरोप सिद्ध करण्याचे बंडू हर्णेंचे आव्हान
कणकवली,दि.१४ ऑगस्ट
शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे कोणत्याही प्रकारे कोणालाही मध्यस्थी घालून उपोषण मिटवण्याकरिता प्रशासनाजवळ प्रयत्न करणार याची आम्हाला खात्री आहे. परंतु कणकवली शहरात जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बोगस मतदार असतील तर ते खरोखरच कमी झाले पाहिजेत. व संदेश पारकर यांनी हे मतदार कमी होण्यासाठी गेले पंधरा दिवस केलेले सर्व प्रकार फळाला आले पाहिजे. तर त्यांनी उपोषण हे केलेच पाहिजे उपोषण करायची घोषणा करून पळ काढू नका,व. कारण त्यांच्या उपोषणातून जर खरोखरच बोगस मतदार नोंदणी झाली असेल तर ती कमी होईल. व कणकवलीचा नगराध्यक्ष हा यापुढे कर्नाटकचे नाही तर कणकवलीचे मतदार निवडतील असे कणकवलीचे नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी म्हटले आहे
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या पंधरा दिवसात अनेकदा पत्रकार परिषदा घेत एसआयआर संदर्भात प्रशासन व मंत्र्यांपर्यंत निवेदन दिले. परंतु यांच्या निवेदनाला कोणीच किंमत देत नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी संदेश पारकर यांचे उपोषण हे स्टंट ठरणार हे त्यांच्याच लक्षात आले. यामुळे त्यांनी कालपासून आपले उपोषण होण्यापूर्वीच आश्वासन घेऊन मिटवण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. कणकवली शहराच्या मतदार यादीवर व अधिकाऱ्यांवर आरोप करत असताना संदेश पारकर यांनी बोगस मतदार नोंदणीचा आरोप केला. ही बोगस मतदार नोंदणी जर झालेली असेल तर खरोखरच ही नावे काढली गेली पाहिजेत. पण जर अशी नोंदणी झालेली नसेल तर नगराध्यक्ष पारकर यांचा गेले काही दिवस असलेला आटापिटा कशासाठी होता ते न समजण्याएवढी कणकवलीची जनता दुधखुळी नाही. त्यामुळे न होणारे उपोषण करण्याचा फार्स नगराध्यक्ष पारकर यांनी केला असून हिम्मत असेल तर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हे आमरण उपोषण करून दाखवावे. आणि केवळ प्रसिद्धीत राहण्यासाठी घोषणा न करता खरोखरच बोगस नावांबाबत आपण केलेले आरोप उपोषण करून सिद्ध करून दाखवावे. कारण आता मुख्याधिकारी यांच्या म्हणण्या प्रमाणे काम करत नाहीत, त्यांच्यावर आरोप केले, तहसीलदार प्रांत ऐकत नाही म्हणून त्यांच्यावर आरोप केले,