कणकवली : असलदेत एसटीचे ‘स्मार्ट’ एनसीएमसी कार्ड वाटप

शेअर करा

असलदे ग्रामपंचायत व विकास सोसायटीच्यावतीने शिबिराचे आयोजन ; गावातच सेवा उपलब्ध केल्याने महिलांनी व्यक्त केले समाधान

कणकवली,दि.०२ ऑक्टोंबर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी ‘वेगवान, सुरक्षित, स्मार्ट पेमेंट’ या संकल्पनेअंतर्गत रुपये ऑन द – गो (एनसीएमसी ) स्मार्ट कार्ड सेवा सुरू करण्यात आली आहे. कणकवली बसस्थानकात या कार्डची नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु असलदे गावातील महिला व नागरिकांना गावातच संबंधित एजन्सीकडून विशेष शिबिर असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या पुढाकाराने घेण्यात आले होते. या शिबिरात ‘स्मार्ट’ एनसीएमसी कार्ड 66 महिला व नागरिकांनी नोंदणी केली होती. त्या सर्वही महिलांना स्मार्ट कार्डचे वाटप असलदे ग्रामपंचायत येथे करण्यात आले.
यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब, ग्रा.प.सदस्य दयानंद हडकर,आनंद तांबे, विजय डामरे, अनिल लोके, मनोज लोके , पंकज आचरेकर, दयानंद डगरे, संदेश आचरेकर,प्रकाश आचरेकर, मयुर जंगले, संतोष डामरे, ग्रामसेवक संजय तांबे, संबंधित एजन्सी संचालक रुपेश जाधव , अविनाश राणे , बबन मिठबांवकर, बाबल पांचाळ, ग्रा.प.कर्मचारी मधुसुदन परब, सत्यवान घाडी , प्रतीक्षा परब, आशा सेविका भाग्यश्री नरे आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी महिला उपस्थित होते.

शेअर करा