कणकवली : सुशांत नाईक उपनगराध्यक्ष ही आ .निलेश राणे यांचीच कृपा – संदीप मेस्त्री

शेअर करा

कणकवली,दि.०२ जुन
सुशांत नाईक खासदार राणे यांच्या पराभवावर बोलले, खरं तर तुमच्या राजकीय टीका टिप्पनीत वैयक्तिकपणे खासदार राणे यांच्यावर बोलण्याचा दुरान्वये संबंध नव्हता. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत खासदार राणे यांनी कणकवली शहरातून एक फेरी मारली असती,तरी शहर विकास आघाडी फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित राहिली असती. निकाल काही वेगळाच असता हे सुज्ञ कणकवली जाणते. राणे पराभूत झाले म्हणून भाष्य करणारे सुशांत नाईक स्वतःच्या आणि शहर विकास आघाडीच्या विजयाचा उल्लेख करताना वैभव नाईक यांचा देखील वाटा आहे असा उल्लेख केला. तसच असेल तर स्वतः वैभव नाईक, विनायक राऊत हे देखील पराभूत झाले असताना तुमच्या विजयात त्यांचा वाटा कसा असा असू शकतो?असा सवाल करत सुशांत नाईक उपनगराध्यक्ष ही आ .निलेश राणे यांचीच कृपा असल्याचा टोला भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी लगावला.

त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी खासदार राणे यांचा उल्लेख सुशांत नाईक यांनी करू नये. फक्त प्रसिद्धीसाठी खासदार राणेंवर टीका करणाऱ्या सुशांत नाईक यांना खासदार राणे ओळखत देखील नाहीत.त्यामुळे थोड्याच दिवसाचे उपनगराध्यक्ष म्हणून आपण कार्यकाळ सांभाळावा,. काम कमी आणि बडबड जास्त अशी परिस्थिती नाईक यांची झाली असून कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष कार्यालय हे राजकीय टिकेचे स्थान बनले असल्याचे कणकवलीकर का म्हणत आहेत याचा विचार नाईक यांनी करावा.यापुढे खा. राणे यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला

शेअर करा