शासनाच्या स्तुत्य उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जलसंधारणासाठी सामूहिक पुढाकार
कणकवली,दि.०९ऑक्टोबर
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने बिडवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवाकर मेस्त्री, उपाध्यक्ष राधिका तेली यांच्यासह पालकांनी मोलाचे सहकार्य केले.
या वनराई बंधारा उभारणीच्या कार्यात हेमंत चव्हाण, चव्हाण, नारायण उद्धव, एकनाथ पवार, कामतेकर सर, साक्षी सुतार, सान्वी फोंडके, अंकिता घाडी, विशाखा घाडी आणि सायली लाड यांच्यासह इतर पालकांनीही सहभाग नोंदवला.
पालकांच्या सहकार्यामुळे शासनाचा जलसंधारणाचा हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबवता आला. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविणे ही काळाची गरज आहे. बिडवाडी येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.