कणकवली : वारगांव सरपंच नाना शेटये यांनी स्वखर्चातून केलं प्राथमिक शाळांचे रंगकाम

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम ; शैक्षणिक उपक्रमाबद्दल विद्यार्थी पालकांनी व्यक्त केले समाधान ..

कणकवली ,दि.२४ जून
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वारगांव नं. 1 या शाळेची संपूर्ण इमारत रंगकाम पुर्णत्वास गेले आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारगांव नं. 2 या शाळेच्या रंगकामाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वारगांव सरपंच नारायण शेट्ये यांनी स्वखर्चाने या शाळांना रंगकाम करण्याचा उपक्रम राबवला आहे. शैक्षणिक उपक्रमाबद्दल विद्यार्थी पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शेअर करा