अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनातून नाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान; अनेक कलाकारांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका
कणकवली ,दि.११ ऑक्टोब
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील रहिवासी तथा ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वासुदेव वरुणकर (वय ६७)यांचे रविवारी, दि.११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
सुहास वरुणकर यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला होता. तसेच अनेक नाटकांचे लेखन व दिग्दर्शनही केले होते. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा मार्फत आयोजित नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होत वैयक्तिक तसेच सांघिक अनेक पारितोषिके मिळविली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार घडले आहेत. बागेश्री थिएटर्स,अक्षरसिंधु कला मंच ,वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी नाट्य क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांच्या निधनामुळे नाट्य तसेच सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवलीच्या अध्यक्ष पदी ते सध्या कार्यरत होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,जावई असा परिवार आहे.