कणकवली : कलमठमधील आदर्श अंगणवाडी व शाळेची जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी केली पाहणी..

शेअर करा

कलमठ ग्रामपंचायतीच्या उपक्रमांचे केले कौतुक ;आहे.शैक्षणिक विकासच गावाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवतो..

कणकवली ,दि.०२ जुलै

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी गुरुवारी कलमठ गावाला भेट देत येथील आदर्श अंगणवाडी तसेच मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात यश मिळविलेल्या बाजारपेठ शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.

पाहणीदरम्यान शाळेतील सीसीटीव्ही व्यवस्था, डिजिटल वर्ग, भौतिक सुविधा, सुशोभीकरण, विद्यार्थीस्नेही वातावरण, वाय-फाय सुविधा, प्रयोगशाळा तसेच अंगणवाडीतील पोषण आहार व्यवस्थेची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना अनुराधा नारकर म्हणाल्या, कलमठ गावातील शैक्षणिक उपक्रमांविषयी आतापर्यंत ऐकून आणि वाचून माहिती होती. मात्र आज प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर येथील शाळा व अंगणवाडीने केलेले उल्लेखनीय कार्य अनुभवता आले. गावातील शैक्षणिक विकास हा समाजासाठी दिशादर्शक असून, शहरालगतचे गाव असूनही विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राखण्यात शाळा, शिक्षक आणि व्यवस्थापनाने केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.शैक्षणिक विकासच गावाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवतो,” असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, स्वप्नील चिंदरकर, मुख्याध्यापिका मधुरा सावंत, अनुप वारंग, नितीन पवार, पप्पू यादव, संतोष रेवंडकर, आबा कोरगावकर, प्रवीण सावंत, प्रणय शिर्के, अभिजित सावंत, अंगणवाडी सेविका पूजा हुन्नरे, प्रमोद पवार, शुभांगी सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा