कणकवली-फोंडा मार्गावर कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू

शेअर करा

कणकवली,दि.१३ ऑगस्ट

कणकवली-फोंडा मार्गावर डामरे (करूळ) येथील कानडेवाडी स्टॉपजवळ झालेल्या अपघातात ब्रेझा कार चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री ९.४५ वाजण्यापूर्वी घडला.या अपघातात मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८, रा. फोंडाघाट बाजारपेठ, ता. कणकवली) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत वृत्त असे की,चालक आपल्या ताब्यातील ब्रेझा कार घेऊन कणकवलीहून फोंडाघाटच्या दिशेने जात होते. डामरे (करूळ) कानडेवाडी स्टॉपजवळ आल्यानंतर चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्यालगत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर आदळले. या अपघातात चालक मैत्रेय उर्फ गोट्या पेडणेकर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी विजय गोविंद हळदिवे (वय ५३, रा. फोंडाघाट बाजारपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातानंतर पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव व पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील करीत आहेत.

शेअर करा