Kudal News : घोटगे गावातील तरुण वर्गासाठी व्यायामशाळा मंजूर

शेअर करा

सरपंच चैताली ढवळ यांचा नवा आदर्श

व्यायामशाळा बांधणीसाठी २ गुंठे विनामोबदला जागा मंजूर

कुडाळ,दि.०३ नोव्हेंबर

आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व वाढले असून यामध्ये प्रामुख्याने युवापिढी आरोग्याविषयी जागरूक राहावेत यासाठी कुडाळ तालुक्यातील घोटगे गावच्या सरपंच चैताली ढवळ यांनी एक वेगळा उपक्रम राबविला आहे. सरपंच चैताली ढवळ यांनी तरुण वर्गासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व्यायामशाळा मंजूर केली असून समाजकारणात नवा आदर्श निर्माण केला आहे. तसेच व्यायामशाळा बांधणीसाठी २ गुंठे विनामोबदला जागा कै. भिसाजी शंकर ढवळ, घोटगे माजी सरपंच कै. महादेव शंकर ढवळ, कै. गोविंद शंकर ढवळ, कै. माजी सरपंच सहदेव शंकर ढवळ, कै. सोनु शंकर ढवळ यांच्या नावाने घोटगे ग्रामपंचायत गावासाठी दान केली आहे. या निर्णयामुळे घोटगे गावातील नागरिकांनी सरपंच चैताली ढवळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

शेअर करा