कुडाळ : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप

शेअर करा

कुडाळ,दि.०९ ऑगस्ट

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कुडाळ कविलकट्टा, कुडाळ नं. १, कुडाळ कन्याशाळा, कुडाळ बाबाचांद उर्दू शाळा, कुडाळ कुंभारवाडा, पांडुरंगशेठ पडते पडतेवाडी, कुडाळ एमआयडीसी, कुडाळ मज्जिद मोहल्ला उर्दू, कुडाळ सांगिरडे या शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर, तालुका चिटणीस राजू गवंडे, महिला जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका अक्षता खटावकर, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका आफ्रीन करोल, महिला शहर उपाध्यक्षा विशाखा कुलकर्णी, तेजस्विनी वैद्य, माजी नगरसेवक सचिन काळप, राजू बक्षी, राजेश पडते आदी उपस्थित होते. पांडुरंगशेठ पडते शाळेत पहिलीतील विद्यार्थी विहान कुणाल तेंडुलकर यांनी उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.

शेअर करा