मालवण : बॅरिस्टर नाथ पै सेवांगणात २६ जूनला ‘अंब्रेला पेंटिंग वर्कशॉप’चे आयोजन

शेअर करा

पावसाळा, रंग आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम; नामवंत कलाशिक्षक बलराम सावंत व स्नेहल सावंत यांचे मार्गदर्शन, कार्यशाळा सर्वांसाठी खुली 🎨☂️🌧️

मालवण, दि. १९ जून

पावसाळा, रंग आणि सर्जनशीलतेचा एक सुंदर संगम साधत येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे २६ जून रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत ‘अंब्रेला पेन्टिंग वर्कशॉप’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपली छत्री स्वतःच्या कल्पकतेने कशी सजवावी, याचे थेट धडे या कार्यशाळेत दिले जातील. यात नामवंत कलाशिक्षक बलराम सावंत, स्नेहल सावंत हे उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आयोजकांकडून एक आकर्षक छत्री, २ ब्रश, एक अॅक्रिलिक रंगांचा बॉक्स साहित्य मोफत दिले जाईल.

या कार्यशाळेसाठी प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्यशाळेसाठी जागा मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी आपली पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी वैष्णवी आचरेकर – ९४०४७७६५५७ संजय आचरेकर-९४२१५६९७०४ येथे संपर्क साधावा. या पावसाळ्यात आपल्या कल्पकतेला पंख देण्यासाठी आणि स्वतःच्या हाताने सजवलेली छत्री मिरवण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा