मालवण : स्विमिंग पूलमध्ये उडी ठरली जीवघेणी; कोल्हापूरच्या युवकाचा जागीच मृत्यू

शेअर करा

मालवण,दि. २२ जून

मालवण शहरालगत असणाऱ्या वायरी येथील रिसॉर्ट मधील छोट्या स्विमिंग पूल मध्ये उंचावरून उडी मारल्याने श्रेणीक मिलिंद टाकळे (रा. इस्लामपूर ता. कागल, जि. कोल्हापूर) या २५ वर्षीय युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

यां दुर्घटनेची माहिती श्रेणीक टाकळे याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पेडणेकर करत आहेत.

शेअर करा