मालवण : वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वडाचापाट ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांना शेतीपूरक औजारांचे वाटप

शेअर करा

मालवण ,दि.०१ जुलै

वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या फावडे या साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आवश्यक साधने उपलब्ध होण्यास मदत झाली असून, ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले.
कार्यक्रमास माजी सभापती श्री. राजेंद्र प्रभुदेसाई, सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई, उपसरपंच श्री. सचिन महादेव पाताडे, सदस्य श्री. विनायक प्रभुदेसाई, ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण सरमळकर, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीकांत पाटकर, अंगणवाडी सेविका पूर्वा पाटकर, गावातील उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित शेतकरी, ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शेअर करा