मालवण,दि.०३ ऑगस्ट
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार दिनांक 29 जुलै २०२६ रोजी गीत गायन कार्यक्रम उत्साह पूर्ण वातातरणात संपन्न झाला .कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनाने करण्यात आली .गुरु- शिष्य परंपरेचे महत्व अधोरेखित करणारे विविध भक्तिमय प्रेरणादायी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकले यामध्ये कु.अंकित घोगळे कु.ओंकार पवार, कु ओम टेमकर कुमारी श्रेया सावंत यांनी सहभाग घेतला तर विशेष कार्यक्रमाचे विशेष आकर्षण प्राचार्य मा. ध्वजेंद्र मिराशी व प्रा. कविटकर सर यांनी सुद्धा आपले सुमधुर गीते सादर करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला.यांना संगीत साथ विद्यार्थी कु मयूर नांदोसकर व कु.सुरज नांदोसकर यांनी दिली .
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य मा.ध्वजेंद्र मिराशी ,उपप्राचार्य मा.प्रा. रवींद्र गावडे , सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून गुरुपौर्णिमेनिमित्त महत्त्व विशद केले आणि गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी प्रमुख कुमारी संचिता करावडे तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका कांचन खानोलकर यांनी केले. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात भक्तिमय- प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.