स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; मनोज मयेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
मालवण,दि.१३ जून
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग विशेष पथकामार्फत मालवण पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार यावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 17,860 किमतीचे मटका जुगार साहित्य ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मनोज अनिल मयेकर (वय.43) रा. धुरीवाडा, मालवण याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलाम 12 (अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार 12 जून रोजी सायंकाळी धुरीवाडा मालवण येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम,
यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, महिला पोलीस अंमलदार स्वाती सावंत, यांनी केली आहे.