आरोपी तर्फे अॅड उल्हास कुळकर्णी, अॅड प्राची कुळकर्णी, अॅड अमेय कुळकर्णी यांनी पाहिले काम
मालवण ,दि.१३ जुलै
सात वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील बिळवस भोगलेवाडी येथे महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विलास तुकाराम भोगले व किशोर तुकाराम भोगले यांची सबळ पुराव्याअभावी मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
दि. २३/०५/२०१९ रोजी फिर्यादी व तिची जाव हे बिळवस भोगलेवाडी येथील वादग्रस्त जमीन मिळकतीची साफसफाई करण्यास गेले असता फिर्यादीची जाउ ही फिर्यादीपासुन काही अंतरावर फिरत असताना विलास तुकाराम भोगले व किशोर तुकाराम भोगले हे तेथे आले व फिर्यादी महिलेच्या जवळ आले व तिला शिवीगाळी करुन तिच्या नवऱ्यास कापुन टाकण्याची धमकी दिली व तिचा विनयभंग केला. म्हणुन फिर्यादीने आरोपी विरुध्द फिर्याद दाखल केलेली होती. याबाबत आरोपी विरुध्द भा.द.वि कलम ३५४, ३५२, ५०४, ५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. सदर खटल्याची सुनावणी मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. फकीह यांच्या समोर होऊन आरोपीं विरुध्दचा गुन्हा सबळ पुराव्या अभावी शाबित होऊ न शकल्याने आरोपी विलास तुकाराम भोगले व किशोर तुकाराम भोगले यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे अॅड उल्हास कुळकर्णी, अॅड प्राची कुळकर्णी, अॅड अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले.