मालवण ,दि.१७ जुलै
मालवण व किनारपट्टी भागात सोने तारण ठेवून संबंधित रकमेवर आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून, अनेक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, महिला तसेच इतर नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि बाधितांना न्याय मिळावा यासाठी पालकमंत्र्यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित प्रकरणात आर्थिक फसवणूक झालेल्या सर्व मच्छीमार, महिला, पर्यटन व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनी पुढे येऊन आपली माहिती व कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केले आहे.