मसुरे ,दि.०२ जुलै(झुंजार पेडणेकर)
सद्गुरु श्री श्री108 महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास, रजी. माड्याचीवाडी (कुडाळ) या सामाजीक संस्थेच्या वतीने पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे सौ इंदिरा दत्तात्रय वदर्म हायस्कुल पोईप या शाळेत 4 जुलै रोजी सकाळी ९:४५-वा. योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर संस्था सामाजीक कार्यात अग्रेसर असून निराधाराना आधार योजना, कॅन्सरग्रस व रुग्णाना आर्थिक मदत, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरीब गरजू कुटुंबियांना मदत या योजने अतर्गत अनेकाना मदतीचा हात देण्यात आला आहे. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून एक गाव दोन योग शिक्षक हि संकल्पना सुरु असून तसेच योगाचा प्रचार प्रसार व महत्व तळागाळा पर्यत पोहचवून समाजातील जनतेला निरोगी जिवन जगता यावे यासाठी संस्थेचे कार्य सुरू आहे. शासन मान्य योग शिक्षक व्हा व स्वत:चा रोजगार निर्माण करा या माध्यमातून तरूणाना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व श्री सदगुरू भक्त सेवा न्यास यांच्या सयुक्त विद्यमानाने योग अभ्यास वर्ग सुरू असून यामध्यमातू सुमारे 100 योग शिक्षक घडले आहेत. व त्याना रोजगारही प्राप्त झाला आहे. संस्थेचे आनंद सावंत हे आतंराष्ट्रीय योग प्रशिक्षक जे189 देशात योगा शिकवू शकतात, MBA Bsc(Agri) MA योगशास्र, वैद्यकीय योगा थेरेफिस्ट, रेकी मास्टर याच्या प्रशिक्षणातून योग अभ्यास वर्ग व अनेक शाळा व ग्रामपंचायती मध्ये योगाचा प्रचार प्रसार सुरू आहे. विद्यार्थाचा अभ्यासाचा ताणतनाव दूर करून मुक्त जिवन जगता यावे व अभ्यासात प्रगती करता यावी हा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. उपस्थितीचे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.