*
फोंडाघाट, दि. ०७ जुलै (संजय सावंत)
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण व्हावी, त्यांची जिज्ञासा वाढावी ,त्यांच्यामध्ये वैज्ञानिक व संशोधन वृत्ती जोपासावी, यासाठी मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे इयत्ता 6वी व 9वी करिता मराठी व इंग्रजी माध्यमातून गेली 45 वर्षे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक ही स्पर्धा परीक्षा लेखी , प्रात्याक्षिक ,प्रकल्प व मुलाखत अशा 4 टप्प्यांमध्ये ही राष्ट्रीय स्तरावर
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, विदर्भ, लातूर. व महाराष्ट्र उर्वरित राज्ये अशा ९ विभागातून घेतली जाते.
2026-27 या शैक्षणिक वर्षात या परीक्षेकरिता नावनोंदणी शाळेमार्फत ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांनी करावयाची आहे. ऑनलाइन अर्ज 1 जुलैपासून उपलब्ध झाले आहेत. नावनोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 29 जुलै २०२६ आहे.
ज्या मुलांची शाळेमार्फत नावनोंदणी होणार नाही, त्यांना वैयक्तिक नावनोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याकरता मुलांना शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज नोंदणी करता खालील माहिती आवश्यक आहे. मुलाचे नाव व्हॉट्सअॅप नंबर, जन्मदिनांक , माध्यम, ईमेल आयडी, फोटो .
लेखी परीक्षा १०० गुणांची व वेळ ९० मिनिटे असतो
लेखी परीक्षेकरिता सिंधुदुर्गात सावंतवाडी व कसाल या ठिकाणी केंद्र आहे.
लेखी परीक्षेतून मराठी व इंग्लिश माध्यमातून विभागवार 7.5% मुले प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवडली जातात. प्रात्यक्षिक परीक्षा कोल्हापूर येथे होईल. प्रात्यक्षिक परीक्षेतून 10% विद्यार्थी प्रकल्प.
व मुलाखत याकरिता निवडले जातात. हा टप्पा मुंबई येथे होतो.
अंतिम टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधून 10% विद्यार्थ्यांना स्वर्णपदक व स्कॉलरशिप 50% विद्यार्थ्यांना रजत पदक व स्कॉलरशिप व उर्वरित विद्यार्थ्यांना काश्यप पदक व स्कॉलरशिप देऊन गौरविण्यात येते.
तसेच निवड झालेल्या बालवैज्ञानिकाना २ दिवसाच्या शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळते या शिबिरात त्याना नामांकित शास्त्रज्ञाचे विवध विषयावर मार्गदर्शन लाभते
दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशभरातून या परीक्षेकरिता विद्यार्थी सहभागी होत असतात.
सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा. प्रवेश प्रक्रिया अंतिम दिनांक 29 जुलै आहे याची नोंद घ्यावी. www.msta.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे . अधिक माहिती करता जिल्हा समन्वयक सौ. सुष्मा केणी 9284035326 यांच्याशी संपर्क साधावा.