दोडामार्ग, दि. २१ मे
दोडामार्ग तहसीलदार कार्यालय इमारत सुरुवातीला वादग्रस्त ठरली होती नवीन इमारत ताब्यात दिल्यावर गळती सुरू झाली होती यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग चर्चेत आले होते या नंतर इमारत गळती रोखण्यासाठी वर पञा शेड इतर कामे कामे यावर ४० लाख रुपये खर्च केले. पण इमारत मध्ये सुधारणा झाली नाही बांधकाम स्लॅब बरोबर नसल्याने स्लॅब तुकडे पडणे भेगा हे प्रकार सुरू होते बांधकाम विभाग कडे तक्रार करून देखील दूर्लक्ष करण्यात आले. गुरूवारी दोडामार्ग तहसीलदार इमारत स्लॅब तुकडे चक्क खाली पडले सुदैवाने नागरिक थोडक्यात बचावले. पावसाळ्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तेव्हा झोपी गेलेल्या बांधकाम विभाग यांनी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.