सावंतवाडी: रामानंद संप्रदायातर्फे १० ऑगस्ट पर्यंत रक्तदाता व रक्तमित्र नोंदणी करण्याचे आवाहन

शेअर करा

सावंतवाडी,दि.०५ ऑगस्ट

श्रीमत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पवित्र प्रेरणेतून आणि संकल्पनेतून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत रामानंद संप्रदायातर्फे पूर्ण भारतभर ” ब्लड इन निड “या सेवेचे भव्य लोकार्पण होणार आहे. त्यासाठी “ऋणानुबंध” ॲपद्वारे “रक्तदाता व रक्तमित्र” नोंदणीचे आवाहन करण्यात येत आहे.
यासाठी १० ऑगस्ट पर्यंत आपण “ऋणानुबंध” या अँपद्वारे आपली नोंदणी करू शकता. “रक्ताच्या अभावामुळे कोणाचाही जीव जाऊ नये” हा श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा सेवासंकल्प आहे. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे. जे स्वतः रक्तदान करू शकतात त्यांनी “रक्तदाता” म्हणून नोंदणी करावी. व जे रक्तदान करू शकत नाहीत त्यांनी “रक्तमित्र” म्हणून नोंदणी करून सहकार्य करावे.”ब्लड इन निड”* या सेवेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 27638 जणांचे प्राण वाचले आहेत..
ही सेवा देशव्यापी व्हावी या उद्देशाने रामानंद संप्रदायातर्फे जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन सर्वच स्तरातील लोकांना करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी संपर्क श्री. विलास परब 9420823872
9359821659 यांना करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा