सावंतवाडी : कारिवडे पेडवेवाडीत अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

शेअर करा

सावंतवाडी,दि.०१ जुन


धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती कारिवडे पेडवेवाडी येथे शेखर डोईफोडे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री धाकुजी डोईफोडे, सल्लागार सीताराम लांबर , सचिव विलास जंगले खजिनदार लक्ष्मण धोंडू पाटील, माजी अध्यक्ष जानू पाटील मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश फाले शेखर डोईफोडे नंदू खरात मधुकर खरात, केदु शेळके, ज्येष्ठ आजीव सभासद श्री नवलू पाटील, धोंडू पाटील, संतोष डोईफोडे, संतोष पाटील, तसेच महिला भगिनी, सौ जनाबाई पाटील काकी आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मंडळाचे खजिनदार लक्ष्मण धोंडू पाटील यांनी केले तर प्रास्ताविक जानू पाटील यांनी केले. सिताराम लांबर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. शेवटी लक्ष्मण पाटील यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा