विविध वयोगटातील खेळाडूंचा सहभाग; धावणे, उंच उडी, भालाफेक, गोळाफेकसह विविध क्रीडा प्रकारांत दाखवणार कौशल्य
सावंतवाडी, दि. २५ ऑगस्ट
राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खेळाडू दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने निवड करण्यात आलेला ५८ खेळाडूंचा संघ बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.
या संघात विविध वयोगटातील ५८ गुणवंत खेळाडूंसह दोन संघ व्यवस्थापक आणि पाच मार्गदर्शकांचा समावेश आहे. डेरवण येथील क्रीडा संकुलात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्गचे खेळाडू धावणे, उंच उडी, लांब उडी, विविध फेकीचे प्रकार, हर्डल्स, रेस वॉक, ट्रायथलॉन, पेंटॅथलॉन तसेच हेप्टॅथलॉन अशा विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
१४ वर्षांखालील गटात हर्षित संतोष नाईक, ऋतिक समीर सावंत, चैतन्य मारुती चव्हाण, सहज रवींद्र बुरुड, तनुज बाळकृष्ण कदम, दिया दिलीप मालवणकर, महिमा विशाल मोहिते, आस्था अमित लिंगवत आणि मैथिली सचिन गावडे यांची निवड झाली आहे. यामध्ये ट्रायथलॉन, किड्स जावेलीन आणि १०० मीटर धावण्याचा समावेश आहे.
१६ वर्षांखालील गटात भावेश प्रवीण जोईल, आशीर्वाद प्रमोद सातपुते, करण आनंद गवळी, रमेश संजय परब, कुलदीप प्रशांत हरेर, साईश किशोर म्हाडदळकर, देवेश गोपाळ नाईक, रुद्र संतोष गावडे, रुद्राक्ष किशोर मरगज, हर्ष रवींद्रनाथ गोसावी, रिया आनंद मोहिते, ओजस्वी विजयसिंग भोसले, चैताली लक्ष्मण झोरे, रेवती हेमंत फाटक, लिशा दयानंद तेली, आर्या आनंद परब, गौरी सचिन डोंबले आणि वैदेही प्रकाश नारकर सहभागी होणार आहेत. हे खेळाडू धावणे, उंच उडी, लांब उडी, भालाफेक, गोळाफेक, पेंटॅथलॉन आणि ८० मीटर हर्डल्समध्ये सहभागी होतील.
१८ वर्षांखालील गटातही सिंधुदुर्गचे मोठे प्रतिनिधित्व आहे. दक्ष नंदकिशोर धुमाळ, जयराज प्रदीप गावडे, सुजय संतोष चिले, निनाद भिवा आंगणे, विघ्नेश प्रमोद जाधव, विनीत शंकर परब, स्वागत दिनेश नाईक, ओंकार अजित कानशिडे, राज मंगेश खोपकर, गणेश भास्कर धुरी, मित सुशांत मुळ्ये, यश किरण घोगळे, वैभव शंकर वाघमोडे, सहदेव लक्ष्मण पाडलोस्कर, सुशांत अनिल परब, सहदेव सक्षम कांबळे, खुशी नागेश खरात, सानिका सुभाष सावंत, आर्या आपा कापडी, संध्या ज्योतिबा गोधूळकर, प्राची दत्ताराम राऊळ, सुमती चव्हाण, त्रिशा महेश काणेकर, मानस रामचंद्र दाभोलकर, जतीन वासुदेव कुंभार, स्वराज स्वप्नील सुर्वे, साजन शंकर दळवी, शुभम सुनील पाडये, दर्शन पडते, मेधा प्रमोद सातपुते आणि साक्षी सुहास कापडोस्कर हे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
१८ वर्षांखालील १००० मीटर मेडले रिले संघात जयराज प्रदीप गावडे, सुजय संतोष चिले, निनाद भिवा आंगणे, विघ्नेश प्रमोद जाधव आणि यश किरण घोगळे यांचा समावेश आहे.
संघ व्यवस्थापक म्हणून महेश कदम, तर महिला व्यवस्थापिका म्हणून चंद्रकला सातपुते जबाबदारी सांभाळणार आहेत. रामदास देशमुख, हर्ष जाधव, दिलीप मालवणकर आणि साहिल कारेकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडुलकर, अध्यक्ष रणजितसिंग राणे आणि बाळकृष्ण कदम यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले आहे.