सावंतवाडी,दि.२ जुलै
सावंतवाडी तालुक्यातील रिक्त झालेल्या पोलिस पाटील पदांचा अतिरिक्त कार्यभार शेजारच्या गावांतील पोलिस पाटलांकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
तालुक्यातील ओवळिये येथील रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देवसू येथील पोलिस पाटील यांच्याकडे, तर कुणकेरी येथील रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार आंबेगाव येथील पोलिस पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासोबतच मळेवाड येथील रिक्त पोलिस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार कोंडुरे येथील पोलिस पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. संबंधित गावांचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालण्यासाठी हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.