सावंतवाडी,दि.०२ ऑगस्ट
जीवन शिक्षण शाळा, आरवली नं. १ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जीवन शिक्षण शाळा, आरवली नं. १ येथे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीत लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजकार्य आणि समतेचा संदेश यांवर अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने, ओघवत्या भाषेत आणि प्रभावी शैलीत आपले विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, वाचनाची आवड, संशोधन वृत्ती तसेच महापुरुषांच्या विचारांविषयी आदरभाव निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेच्या शेवटी उत्कृष्ट वक्त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे व प्रभावी सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.