सावंतवाडी,दि.०९ ऑगस्ट
गुळदुवे खरीवरील वळणावर चारचाकी टाटा टीयागो गाडीला अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले.
आरोंदा ते मळेवाड च्या दिशेने रात्रीच्या सुमारास एक चारचाकी वाहन येत असताना,आरोंदा गुळदुवे खरीवरील एका धोकादायक वळणावर ही गाडी आली असता,थेट बाजूला असणाऱ्या खोल दरीत जाता जाता वाचली.मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून सदरील वाहन हे तेथील झाडावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र हे वाहन झाडावर आदळल्यामुळे गाडीचे दर्शनिभागाचे मोठे नुकसान झाले असून,आतील प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून साधारण रात्रीच्या वेळी अपघात घडल्याने या वाहनामधील प्रवासी किती होते याची अधिक माहिती मिळू शकली नाही.