​​सावंतवाडी : नेमळे येथील गोविंद राऊळ यांचा ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून गौरव

शेअर करा

सावंतवाडी, दि. २ जुलै
तालुका कृषि विभागाच्या वतीने आयोजित कृषि दिन कार्यक्रमाप्रसंगी सावंतवाडी तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांना “प्रगतशील शेतकरी” पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये नेमळे गावातील ज्येष्ठ शेतकरी श्री. गोविंद आपा राऊळ यांना भात आणि आंबा पिकामधील त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल ‘प्रगतशील शेतकरी’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती श्री. गौरव मुळीक यांच्या शुभहस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी सभापती सुष्मिता जाधव व मान्यवर उपस्थित होते.
​वयाच्या ७० व्या वर्षीही श्री. गोविंद राऊळ हे शेती क्षेत्रात अत्यंत उत्साहाने आणि कष्टाने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी आजच्या तरुण पिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील इतर सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमधील प्रदीर्घ अनुभवाचा आणि तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
​श्री. गोविंद आपा राऊळ यांना ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून सन्मानित करण्यात आल्याबद्दल नेमळे ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे

शेअर करा