शेतीखर्च वाढीच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त उपक्रम; भातलावणी हंगामात शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीचा हातभार.
सावंतवाडी,दि.०२ जुलै
कृषी दिनाचे औचित्य साधून नेमळे ग्रामपंचायतिच्या वतीने नेमळे गावातील सर्व शेतकऱ्यांना फावडे वाटपाचा कार्यक्रम नेमळे ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला
नेमळे गावात सध्या भात लावणी ची कामे जोरदार सुरु आहेत. यावर्षी अल निनो च्या प्रभावामुळे उशिरा पडलेल्या पावसामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला आहे शेतीसाठी लागणाऱ्या यंत्र औजारे, खते अशा साहित्याच्या किमती वाढल्याने शेती करावी कि सोडून द्यावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे यासाठी शेतीच्या कामासाठी उपयोगी वस्तू म्हणून नेमळे ग्रामपंचायतिच्या वतीने गावातील सर्व शेतकऱ्यांना फावडे वाटपाचा कार्यक्रम नेमळे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला यावेळी नेमळे सरपंच्या दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच नेमळे गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व शेतकऱ्यांनी नेमळे ग्रामपंचायतीचे आभार मानले.